अकोला: या ना त्या कारणावरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. या घटनांनी समाजात मन हेलावून जात असतानाच अशाच प्रकारचा एक धक्का एक विवाहित युवकाने पत्नी व कुटुंबाला दिला असल्याचा प्रकार भाऊबीजेच्या दिवशी समोर आला. पत्नीला फोन करून मी आत्महत्या करत आहे, Akola Crime असे सांगून एका विवाहित युवकाने बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद बु. येथील काटेपूर्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. रवी बाबाराव निखाडे (वय ३५. रा.कृषीनगर, अकोला) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आत्महत्या करत असल्याची माहिती दिली: रवी निखाडे हे घरुन आपल्या मोटर सायकलने निघाले होते. दुपारी बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद गावात पोहोचले. अन् पत्नीला फोन केला. म्हणाला, 'मी काटेपूर्णा नदीत आत्महत्या करत आहे. लागलीच नातेवाईकांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना यांची माहिती दिली.
आपत्कालीन पथकाने घेतला शोध: क्षणाचाही विलंब न करता अवघ्या १५ सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परंतु काहीही दिसून आले नाही. पुन्हा दिपक सदाफळे यांनी नातेवाईकांकडे बारकाईने विचारपूस केली असता. रवी निखाडे हे आपल्या दुचाकीने दोनदलाच गेले असेल, अशी खात्री दिली. यावेळी सदाफळे यांनी रवी निखाडे यांच्या मोबाईलवर संपर्क केला. फोनची रिंग होत होती. मात्र फोनवर कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता.
मंदिराजवळ दिसली दुचाकी: थोडावेळाने नातेवाईक आले असता. तेव्हा रवी निखाडे यांची गाडी दोनद खु. येथील मंदीराजवळ लावलेली दिसून आली. निखाडे यांची पत्नी आणि नातेवाईक आरडाओरडा करु लागले. तेव्हा अलीकडच्या काठावर आसरा देवी मंदीराजवळ दिपक सदाफळे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी नदी परिसरात शोध मोहीम राबवली. तर निखाडे यांचा मृतदेह आढळून आला आणि मोबाईल झाडावर ठेवलेला आढळलेला होता.
पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद: याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली. तात्काळ मृतदेह बाहेर नदीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात पिंजर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे, तर रवी निखाडे याचा आत्महत्याच कारण अद्याप करू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.