अकोला - भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करू पाहत आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असल्यावर पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप एसटी कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा कृती समितीचे सदस्य विजय मालोकार यांनी केला आहे. ते अकोल्यात पत्रकरांशी बोलत होते.
मागणी काय?
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. यामुळे राजभरात एसटी सेवा प्रभावित झाली होती. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याने सणामागे घेण्यात आला. मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटीला राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे. यावरून ते कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे.
यासंदर्भात एसटी कामगार कृती समितीने उडी घेऊन आमदार पडळकर यांच्या व्यक्तव्यावर विरोध दर्शवित पडळकर हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांचे नुकसान करू पाहत आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबाबत अॅड. अनिल परब यांची प्रतिक्रिया
...तर कोण जबाबदार?
एकीकडे मागण्या मान्य होत असताना त्यांचे नुकसान करून त्यांचे आयुष्याचे नुकसान करीत असल्याचा आरोप राज्य कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी केला. विलिनीकरण जर झाले तर त्यामधून कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले तर याला कोण जबाबदार राहणार? असा सवाल त्यांनी केला आहे. भाजप यामध्ये आता राजकारण करू पाहत आहे. सरकारचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजप करीत असून अशा लोकांच्या व्यक्तीला बळी न पडता, कर्मचाऱ्यांनी एसटीची आणि आपली दिवाळी साजरी करा, असे आवाहन विजय मालोकार यांनी केले आहे.