ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या रिक्षाचे स्क्रॅपही कोणी विकत घेणार नाही, बावनकुळे यांचा राज्य सरकारला टोला - छगन भुजबळ यांच्यावर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकामध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानंतर ठाणे, नाशिक या ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. तर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेसाठी एक पथक रत्नागिरीला रवाना केले होते. त्यानंतर राणे यांना अटक आणि जामीन ही मंजूर झाला. मात्र या सगळ्या प्रकरानंतर भाजापाचे माजी मंत्री बावनकुळे यांनी महाविकासआघाडी सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

बावनकुळे यांचा राज्य सरकारला टोला
बावनकुळे यांचा राज्य सरकारला टोला
author img

By

Published : Aug 25, 2021, 1:55 PM IST

Updated : Aug 25, 2021, 3:28 PM IST

अकोला - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून झाला आहे. मात्र, सकारचीही दडपशाही महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राच्या हातामध्ये बटन येईल, त्या दिवशी तीन चाकाच्या रिक्षाचे वाईट हाल होणार आहेत आणि ती रिक्षा स्क्रॅप म्हणून सुद्धा मार्केटमध्ये कोणी विकत घेणार नाही, असा टोला भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना माजी मंत्री बावनकुळे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकामध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानंतर ठाणे, नाशिक या ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. तर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेसाठी एक पथक रत्नागिरीला रवाना केले होते. त्यानंतर राणे यांना अटक आणि जामीन ही मंजूर झाला. मात्र या सगळ्या प्रकरानंतर भाजापाचे माजी मंत्री बावनकुळे यांनी महाविकासआघाडी सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

पोलीस सेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासारखे काम करताहेत-

बावनकुळे पुढे म्हणाले, नारायण राणे साहेबांना अटक करण्याकरिता जी पद्धत वापरण्यात आली ती योग्य नव्हती. त्याच्या अटके साठी एक पोलीस आयुक्त पत्र लिहतो, जसे की ते शिवाजी महाराजांचे सरदार आहेत. त्या प्रमाणे तो अटकेचे आदेश देतो ,कोणतेही गुन्हे दाखल करा, नियमात बसत नसेल तरीही गुन्हे दाखल करा, असे म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात पोलीस दलाने हे काय सुरू केले आहे. पोलीस हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून पोलीस कामगिरी पार पाडत आहेत का? असा आरोप करत महाराष्ट्रातील पोलीस कधी असे नव्हते. जगातील उत्तम पोलीस म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडे पाहिले जात होते. मात्र आता ते राजकीय कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

महाराष्ट्राची जनता आंधळी नाही-

उद्या आमचे राज्य आलं तर आम्ही असे करायचे, त्यांचे आलं तर त्यांनी तसे करायचे, अशाने महाराष्ट्राचे काय होईल? असा सवाल करत बावनकुळे नारायण राणे यांच्या अटक प्रकरणावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेऊन आहे. 12 कोटी जनता ही आंधळी नाही, सुसंस्कृत आहे. त्यामुळे जनताच योग्यवेळी निर्णय करेल आणि ते उभ्या महाराष्ट्रात दिसून येईल असेही मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच छगन भुजबळ यांची शंभर कोटी संपत्ती जप्त केली. त्यावर छगन भुजबळ यांनी ही संपत्ती माझी नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र चौकशीच्यावेळी सर्व असेच म्हणत असतात, असा टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला आहे.

दरम्यान त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणसंदर्भात हे सरकार उदासीन असल्याचा आरोप केला आहे. तसेच पुढील निवडणुका या एसटी, एससी आणि ओपनसाठी करायच्या आहेत. म्हणजे बलाढ्य व श्रीमंत व्यक्तीला ओबीसीच्या गरीब जागेवर लढावायची तयारी या सरकारने केली आहे. या सरकारला ओबीसींवर अन्याय करायचा आहे, असे दिसत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. तसेच सरकारला जर ओबीसींवर अन्याय करायचा नसेल तर अजूनही वेळ आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात ओबीसींचा डेटा तयार होऊ शकतो. डिसेंबरला आरक्षण देता येऊ शकतो. फेब्रुवारी, मार्चच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू शकते, असेही स्पष्टीकरण बावनकुळे यांनी यावेळी दिले. मात्र सरकारला हे करायचे नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

Last Updated : Aug 25, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.