अकोला - उमरी येथे राहणारे महापालिकेचे नगरसेवक संतोष रामकृष्ण शेगोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी रात्री त्यांना हृदविकाराचा झटका आला. ते 40 वर्षांचे होते.
अकोला महापालिकेत पहिल्यांदा भाजपमधून निवडून आलेले संतोष शेगोकार हे उमरी ग्रामपंचायत निवडणुकीत एका मताने पराभुत झाले होते. त्यानंतर हे गाव अकोला महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ते भाजप पक्षातून उभे राहिले होते. त्यामध्ये निवडून आले होते. त्यांना रविवारी अचानक रक्ताची उलटी झाल्याचे समजते. त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शेगोकर यांचा परिसरात दांडगा संपर्क होता. मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.