अकोला - महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले फसवे आश्वासन, महिलांवरील वाढते अत्याचार त्यासोबतच स्थानिक विषयांबाबत भाजपने आज(मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध केला. या धरणे आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी करण्याचा दावाही त्यांनी केला होता. परंतु, या सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली असून महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे भापजने म्हटले आहे.
हेही वाचा - दोन वर्षांचे वेतन थकले, अकोल्यात महिला परिचरांचे साखळी उपोषण
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत भाजपतर्फे निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबतच जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासोबत महिला आघाडी, युवक आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - महाविकास आघाडीचा निषेध, भाजप राज्यात 400 ठिकाणी करणार धरणे आंदोलन