ETV Bharat / state

राज्यात कृषी तंत्र निकेतनच्या साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!, भाजयुमोकडून कृषी विद्यापीठात आंदोलन - पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहा हजार 420 विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक दिली. यावेळी कृषी तंत्र निकेतनचे अधिष्ठाता त्यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासोबत या विद्यार्थ्यांनी चर्चा केली.

आंदोलन
author img

By

Published : Jul 9, 2021, 3:31 PM IST

अकोला - कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहा हजार 420 विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक दिली. यावेळी कृषी तंत्र निकेतनचे अधिष्ठाता त्यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासोबत या विद्यार्थ्यांनी चर्चा केली.

कृषी तंत्र निकेतन सण 2018-2021 च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बेसवर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार आहे.

विद्यार्थ्यांना भ्रमात ठेवून प्रवेश!

2017-2020 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम पूर्ण करून कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या व पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व सन 2018-2021 च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. तरीसुद्धा 2018-2021 या बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेश माहिती पुस्तकामध्ये कृषी पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली तरी काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका देत नाही. विद्यार्थ्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेत आहेत.

भाजयुमोने केले कृषी विद्यापीठात आंदोलन
भाजयुमोने केले कृषी विद्यापीठात आंदोलन

'विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आंदोलन'

सन 2018-2021 या बॅचमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळजवळ सहा हजार 420 आहे. कृषी पदवीला प्रवेश मिळत नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांचे तीन वर्षांचे शैक्षणिक वर्ष त्यासोबतच आर्थिक नुकसान होणार आहे. तरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये धडक देण्यात आली. यावेळी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदिवे यांच्यासोबत चर्चा केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोने विद्यापीठाकडून लेखी आश्वासन घेतले आहे.

हेही वाचा - केरळमध्ये आढळला झिका विषाणू; जाणून घ्या, लक्षणे

हेही वाचा - भीमा-कोरेगाव हिंसाचार : चौकशी आयोगाकडून शरद पवारांचा जबाब नोंदविला जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.