ETV Bharat / state

प्रभू रामचंद्राचे नाव घायचे अन् आदर्श रावणाचा ठेवायचा, बच्चू कडूंचा लोणीकरांना टोला

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला. प्रभू रामचंद्राचे नाव घायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा ही भाजपची संस्कृती असल्याचे ते म्हणाले.

author img

By

Published : Feb 9, 2020, 4:24 PM IST

Bachhu kadu comment on Babanrao lonikar
बच्चू कडूंचा लोणीकरांना टोला

अकोला - भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विधानावर सर्वच क्षेत्रातून टीका होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रभू रामचंद्राचे नाव घ्यायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा, असे म्हणत बच्चू कडू यांनी लोणीकरांना टोला लगावला.

आमदार नितेश राणे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केलेल्या वक्तव्याचा राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दोघांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपची संस्कृती ही प्रभु रामचंद्राचे नाव घ्यायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा अशी असल्याचे ते म्हणाले.

बच्चू कडूंचा लोणीकरांना टोला

आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्रस्त झाले असल्याने त्यांनी सुट्टी घेतली असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना कामच करू देत नसल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खुप काम करत आहेत. त्यांनी खुप मोठा अनुशेष भरुन काढला आहे. 'शेर कभी बुढा होता नही और कभी थकता भी नही' असा चिमटा राज्यमंत्री कडू यांनी काढला.

निधी हवा असेल तर मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा परतूरला करायचा का? असा प्रश्न विचारत त्या मोर्चासाठी तुम्ही सांगाल तर एखाद्या अभिनेत्रीलाही आपण बोलावू, आणि नाहीच भेटले तर तहसीलदार बाई 'हिरोईन' आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावर बच्चू कडू यांनी भाजपची ही परंपरा आणि संस्कृती असल्याचे म्हटले. दानवे हे त्यांचे प्रमुख आहेत. भाजपने असे अनेक वक्ते तयार केले आहेत की, प्रभू रामचंद्राचे नाव घायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा असेही ते म्हणाले.

Intro:
अकोला - आमदार नितेश राणे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केलेली वक्तव्याचा राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दोघांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपची संस्कृती असून प्रभु रामचंद्राचे नाव घ्यायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा असा घणाघात त्यांनी केला.Body:आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्रस्त झाले असल्याने त्यांनी सुट्टी घेतली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना कामच करू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता याबाबत पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खुप मोठा अनुशेष होता. तो त्यांनी दूर केला आहे. ते खूप काम करीत आहे, त्यामुळे 'शेर कभी बुढा होता नही और कभी थकता भी नही' असा चिमटा राज्यमंत्री कडू यांनी काढला.
तर आमदार बबनराव लोणीकर यांनी तहसीलदार या हिरोइन आहे, असे वक्तव्य केले आहे. यावरही त्यांनी भाजपची ही परंपरा आणि संस्कृती आहे. दानवे हे त्याचे प्रमुख आहेत. भाजपने असे अनेक वक्ते तयार केले आहेत. प्रभू रामचंद्राचे नाव घायचे आणि आदर्श रावणाचा ठेवायचा असेही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.