अकोला - मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने दोन लाख रुपयांचा चायना मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. मोहम्मद राजिक मोहम्मद सलीम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अकोला पोलिसांनी चायना मांजा विक्रीच्या गुन्ह्यात किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, होलसेल विक्रेता दूरच असल्याचे चित्र होते. मात्र, दहशतवाद विरोधी पथकाने भगवतवाडी येथे केलेल्या कारवाईत दोन लाख रुपयांचा चायना मांजा जप्त केला आहे. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते. मोहम्मद राजिक मोहम्मद सलिम याच्या घरात ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या घरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात चायना मांजाचे भरून आलेले बॉक्स होते. तर काही पोत्यांमध्ये ही चायना मांजाच्या रील मिळून आल्या आहेत. या कारवाईने चायना मांजाचे व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
पक्षीमित्रांसह नागरिकांनी कारवाईची केली होती मागणी-
चायना मांजावर बंदी असतानाही विक्री होत असल्याबाबत पक्षीमित्र आणि नागरिकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलिसांनी यासंदर्भात कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, वनविभाग कारवाई करण्यापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे
![जप्त केलेला मांजा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-03-raid-chaina-manja-mh10035_13012021223934_1301f_1610557774_132.jpg)
चायना मांजाचा वापराने गंभीर जखमीच्या घडल्या आहेत घटना-
राज्य सरकारने चायना मांजावर बंदी लागू केली आहे. तरीही हा मांजा खुलेआम विकला जात आहे. चायना मांजामुळे पक्ष्यांचे जीव जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर अनेकांना शारीरिक इजा आणि काहींचे प्राण गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
![मांजाचे बॉक्स](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-03-raid-chaina-manja-mh10035_13012021223934_1301f_1610557774_830.jpg)