अकोला - आशा कर्मचाऱ्यांचा कामाचा मोबदला अदा न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेकडून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांनी महापालिकेत आज निदर्शने केली, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात त्यांनी नारेबाजी केली.
या आहेत मागण्या
- आशा कर्मचार्यांना 30 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार कोविड विषाणूच्या निगडित कामाचा ऑगस्ट 2020 पासून 433 रुपये रोज देण्यात यावा
- आशा कर्मचाऱ्यांना चार कामावर आधारित एकत्रित माहे ऑगस्ट 2020 पासूनचा मोबदला देण्यात यावा
- महिन्याच्या पाच तारखेच्या आत मोबदला द्यावा, त्याची पावतीही देण्यात यावा
- आशा कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालाची दुय्यम प्रत देण्यात यावी
- आशा कर्मचाऱ्यांच्या अहवालात त्रुटी असल्यास या त्रुटी पूर्ण करण्याकरता दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा
- अशा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अहवालात त्रुटी असल्यास हा अहवाल पुढील महिन्यात समावुन घ्यावा
आदी मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांनी महापालिकेत नयन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी मायावती बोरकर, सविता प्रधान, अर्चना गुडदे यांच्यासह इतर आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - सोमवारपासून ६८ हजार आशासेविका संपावर; दिवसाला ५०० रुपये मानधन देण्याची मागणी