ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषदेत महिलाराज; भारिप बहुजन महासंघ पाचव्यांदा सत्तेवर

अकोला जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा भारिप बहुजन महासंघाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्षपदी प्रतिभा भोजने यांची, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड झाली.

अकोला जिल्हा परिषदेत महिलाराज
अकोला जिल्हा परिषदेत महिलाराज
author img

By

Published : Jan 17, 2020, 8:57 PM IST

अकोला - जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा भारिप बहुजन महासंघाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रतिभा भोजने यांची, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड झाली.

अकोला जिल्हा परिषदेत महिलाराज

महाविकास आघाडीला भाजपने साथ दिल्याची चर्चा सभा सुरू होण्यापूर्वी रंगली होती. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर भाजपचे सातही सदस्य सभागृहाबाहेर पडल्याने भारिपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. भारिप बहुजन महासंघाकडे 25 सदस्य, तर महाविकास आघाडीकडे 21 सदस्य होते.

हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'
भारिप बहुजन महासंघाकडून अध्यक्षपदासाठी प्रतिभा भोजने (भांबेरी सर्कल) यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी सावित्री राठोड (चोंढी सर्कल) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या गोपाल दातकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर काँग्रेसच्या सुनील धाबेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता.

Intro:अकोला - मिनी मंत्रालयात सत्तास्थापनेसाठी आज चमत्कारिक घडामोडी घडल्या. जिल्हा परिषदेवर पाचव्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा पक्ष असलेला भारिप बहुजन महासंघ यांना दूर ठेवन्यासाठी महाविकास आघाडीला भाजपने साथ दिल्याची चर्चा सभा सुरू होण्याआधी होती. परंतु, भाजपने सभा सुरू झाल्यानंतर भाजपचे सातही सदस्य सभागृहा बाहेर पडल्याने भारिपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी प्रतिभा भोजने (भांबेरी जी. प. सर्कल) यांची तर उपाध्यक्षपदि सावित्री राठोड (जि. प. सर्कल चोंढी) यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील मिनी मंत्रालय भारिपने पुन्हा पाचव्यांदा आपल्या हाथी ठेवली. जिल्हा परिषदेवर महिलाराज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केले आहे. भारिप 25 विरुद्ध महाविकास आघाडी 21 अशा मताने भारिप विजयी झाली.

Body:भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा भोजने (भांबेरी जी. प. सर्कल) यांनी तर उपाध्यक्षपदासाठी सावित्री राठोड (जि. प. सर्कल चोंढी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपाल दातकर ) तर काँग्रेसचे सुनील धाबेकर (जि. प. सर्कल जामवसु) यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी भारिप-बहुजन महासंघाकडे 25 तर महा विकास आघाडीकडे 21 सदस्य होते. भाजप महाविकास आघाडीला साथ देईल अशी चर्चा होती. परंतु, सभा सुरू झाल्यानंतर भाजपच्या सात सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली. त्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडेल. त्यांच्या बाहेर आल्याने भरीपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. सभागृहाबाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आसमंत नीनादून टाकला होता. त्यामुळे भारिपने मिनी मंत्रालयावर पाचव्यांदा आपली सत्ता काबिज करीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.

चौकट.............
असे आहे पक्षीय बलाबल
पक्ष निवडून आलेले सदस्य
भारिप-बमसं २५ (पुरस्कृतांसह)
भाजप ०७
शिवसेना १३
कॉंग्रेस ०४
राष्ट्रवादी कॉंग्रेस ०३
अपक्ष ०१
एकूण ५३

बाईट - धैर्यवर्धन पुंडकर
प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी,Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.