ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार - अकोला दुधपूर्णा दूध उत्पादक संघ

जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या 521 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनच दुधपूर्णा नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:55 PM IST

अकोला - जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीसाठी दुधाळ जनावरे वाटप योजना राबण्यात येते. यासाठी 521 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार

"दुधपूर्णा" नावाने दूध उत्पादक संघ

अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशाने अनेक योजना आहेत. दुधाळ जनावरे वाटप ही यापैकीच एक योजना आहे. ज्या लाभार्थ्यांना ही दुधाळ जनावरे मिळतात. ते लाभार्थी बऱ्याच वेळा ही जनावरे विकून पैसे घेतात. 'दुधपूर्णा' उत्पादक संघ स्थापन केल्यास या समस्येला आळा घालता येईल. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेला दिलेले हे व्यापक स्वरूप आहे. या प्रकल्पासाठी इतर दूध उत्पादक संघाची मदत घेण्यात येणार आहे. या संघाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिन्याला अंदाजे बारा हजार रुपये कमाई करू शकेल असा विश्वास आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

Intro:अकोला - जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून राबविण्यात येणाऱ्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती साठी साठी दुधाळ जनावरे वाटपाच्या 521 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांच्या माध्यमातून दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार आहे. 'दुधपूरणा' उत्पादक संघ या नावाने हा संघ भविष्यात कार्यान्वित होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग राहणार आहे. Body:जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध 15 योजना राबविल्या जातात या योजनांमधून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. या योजनांमधून दुधाळ जनावरे वाटप केल्या जातात. ज्या लाभार्थ्यांनाही दुधाळ जनावरे मिळतात. ते बरेच वेळा ही जनावरे विकून पैसे घेतात. तर काही लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून आपला नवीन व्यवसाय सुरू करतात.
या योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यापक स्वरूप देऊन 521 लाभार्थ्यांना 521 लाभार्थ्यांना कर्जरूपात एकाऐवजी दोन दुधाळ जनावरे देऊ त्या माध्यमातून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चा एक एक दूध उत्पादक संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इतर दूध उत्पादक संघाची मदत घेण्यात येणार असून लीड बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय या लाभार्थ्यांना मदत करणार या लाभार्थ्यांना मदत करणार आहे. या संघाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिन्याला अंदाजे कमीतकमी बारा हजार रुपये महिना हजार रुपये महिना बारा हजार रुपये महिना हजार रुपये महिना कमाई करू शकणार आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, आलेल्या अरजांपैकी 143 लाभार्थी प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
Conclusion:डिफॉल्टर लाभार्थ्यांना मिळणार नाही लाभ
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या 521 लाभार्थ्यांमधील जर एखादा लाभार्थी हा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या खर्चामध्ये परतफेड करू न शकल्याने तो जर बँकेकडे डिफॉल्टर ठरला असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्याच्याऐवजी प्रतीक्षेत असलेल्या 143 लाभार्थ्यांपैकी लाभार्थ्यांपैकी क्रमवारीने हा लाभ देण्यात येणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.