ETV Bharat / state

अकोला-अकोट मार्गावर दोन वाहनांमध्ये अपघात; सहा जखमी - akola accident

अकोला-अकोट रस्त्यावर असलेल्या देवरी फाटा येथे दोन वाहनांमध्ये अपघात झाला असून, यात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

akola accident
अकोला-अकोट रस्त्यावर दोन वाहनांमध्ये अपघात; सहा जखमी
author img

By

Published : Mar 15, 2020, 4:42 PM IST

Updated : Mar 15, 2020, 7:04 PM IST

अकोला - शहरातील अकोट रस्त्यावर असलेल्या देवरी फाटा येथे बोलेरो पिकअप आणि एका खाजगी बसाचा अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपघातानंतर वाहतूक कोंडीही झाली होती.

अकोला-अकोट रस्त्यावर दोन वाहनांमध्ये अपघात; सहा जखमी

हेही वाचा - रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क

बोलेरो पिकअप गाडी (क्र. एमएच 30 बीडी 2647) व खासगी बस (क्र. एमपी 48 पी 0194) यांची देवरी फाटा येथे धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगजेब, गुलाम दसरी, चालक सुधाकर राठोड, स्वराज अजय पावडे यांच्यासह इतर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर तेथील नागरिकांनी धावपळ करीत दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच फसलेली दोन्ही वाहने बाजूला करून झालेली वाहतूक कोंडी दूर केली. यावेळी पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. तसेच याबाबत पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्गाची राज्य सरकारची घोषणा

Last Updated : Mar 15, 2020, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.