अकोला : शिवसेनेच्या चिन्हांवर सुरु असलेल्या रणकंदनावावर सर्वच राजकीय पक्षांकडून मतमतांतरे मांडण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनावणी सुरू आहे. असे असतानाही शिवसेनेचे धनुष्यबाण नेमके कोणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिन्हाबद्दलचा खेळ अतिशय दुर्दैवी - अमरावती पदवीधर विधान परिषद निवडणूकीतील आपचे उमेदवार भारती दाभाडे यांना पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी राज्य उपाध्यक्ष धनंजय वंजारी बोलत होते. पुढे ते म्हणाले, आज जो निवाडा येणार आहे मला वाटतं लवकरात लवकर यायला पाहिजे होता. हा निवड आधीच आला तर बरं होईल. परंतु, परत तारीख पे तारीख होऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. चिन्ह बद्दलचा जो घोळ आहे हा अतिशय दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने लवकर निर्णय घ्यावा - मला वाटते याच्या मागे सत्ता आणि अर्थकारणाचा जे राजकारण आहे जोपर्यंत या प्रस्थापित सत्ताधीशांची समीकरणे बंद दाराच्या आड बसणार नाही तोपर्यंत या संस्था निर्णय देणार नाही. तरीही संविधानाचा वारसा देऊन मी निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाला विनंतीपूर्वक आग्रहपूर्वक निवेदन करतो की त्यांनी निस्पृहपणे, लवकरात लवकर हा निर्णय द्यावा जेणेकरून जनतेची प्रतारणा होणार नाही. या पत्रकार परिषदेत संदीप जोशी, ठाकुरदास चौधरी, अशोक चक्रे हे उपस्थित होते.
हेही वाचा - Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण ठाकरेंचे की शिंदेंचे? निवडणूक आयोगात सुनावणी सुरू