अकोला - दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून दोद्यांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमीचे नाव विशाल भगत असे आहे. त्याला तातडीने उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले गेले. सदर घटनेप्रकरणी दोन्ही हल्लेखोरांना सिव्हील लाइन पोलिसांनी अटक केली आहे.
सिव्हील लाइन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लहान उमरी रेल्वेगटजवळ पंत याचे देशी दारूचे दुकान आहे. या ठिकाणी दारूच्या नशेत असलेले आरोपी अमोल वाघमारे व विशाल घाटोळ दोघांनीही क्षुल्लक कारणावरुन (रा. लहान उमरी) विशाल भगत (रा. तारपैल) याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिव्हील लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी असलेला विशाल भगत याला तातडीने सर्वोपचार रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. सदर दोन्ही आरोपी भादंविचे कलम ३०७/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सिव्हील लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनोद ठाकरे करीत आहेत.