अकोला - प्लास्टर ऑफ पॅरिस आणि माती पासून सुंदर गणपती बनविल्या जातात. तसेच त्यांची कल्पना, रंगरंगोटी, मूर्तीची दिशा, बाजू ही ठरलेली असते. परंतु, एखाद्या वेगळ्या वस्तूंपासून गणपती बनविताना त्याला अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. असाच गणपती मनकर्ना प्लॉट येथील टिल्लू टावरी यांनी तयार केला आहे. ते अपंग आहेत.
पेन्सिलपासून गणपती बनवला असून यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे, एकही पेन्सिल न चिकटवता तब्बल पंचवीस हजार पेन्सिलपासून बाप्पा साकारला आहे. अकोल्यातील मनकर्ण प्लॉट येथील गणपती सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण हा बाप्पा मातीचा नसून हा पेन्सिलपासून बनवला आहे. अकोल्यातील अपंग कारागीर टिल्लू टावरी यांनी 25 हजार पेन्सिलपासून बाप्पा बनवला आहे.
पेन्सिलचा बाप्पा
टिल्लू टावरी हे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती साकारत असतात. यावर्षी त्यांनी 'पेन्सिल बाप्पा' साकारला आहे. हा गणपती भगतसिंग गणेश मंडळाने बसवला आहे. कोणतीही पेन्सिल न चिकटवता तयार केल्या आहे. यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिलचा वापर करून त्यांनी हा गणपती साकारला आहे. यासाठी पेन्सिल कंपनीकडून घेण्यात आल्या आहेत. या गणपतीच्या निर्मितीसाठी 25 हजार पेन्सिल वापरण्यात आल्या आहेत. हा गणपती भक्तांच्या दर्शनसाठी लवकरच खुला केला जाईल.
हेही वाचा - सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी लवकरच निवडणूक