ETV Bharat / state

चायना मांजामुळे अकोल्यात युवकाचा गळा चिरला

author img

By

Published : Jan 14, 2021, 4:57 PM IST

युवकाच्या गळ्याला चायना मांजा लागल्याने त्याचा गळा चिरला गेला आहे. ही घटना गोरक्षण रोडवरील रचना कॉलनी येथे घडली. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

akola
akola

अकोला - दुचाकीने जाणाऱ्या युवकाच्या गळ्याला चायना मांजा लागल्याने त्याचा गळा चिरला गेला आहे. ही घटना गोरक्षण रोडवरील रचना कॉलनी येथे घडली. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शंतनू काशीद असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांचे वडील हे वकिली पेशामध्ये कार्यरत आहेत. रचना कॉलनीमधून गोरक्षण रोड आणि नेहरू पार्ककडे दुचाकीने जाणारे शांतनु काशीद यांच्या गळ्याभोवती चायना मांजा आवळला. त्यामुळे त्यांचा गळा चिरला गेला.

गळा चिरल्यामुळे रक्तस्त्राव

परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांचा गळा बराच चिरल्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी चायना मांजामुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, दहशतवादविरोधी पथकाने मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला दोन लाख रुपयांचा चायना मांजा जप्त केला होता. त्यासोबतच पोलिसांकडूनही छोट्या मोठ्या प्रमाणात चायना मांजा किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांनी चायना मांजा विकणाऱ्या बड्या आसामीवर कारवाई केली नसल्याची स्पष्ट दिसून येत आहे.

वनविभागाची बघ्याची भूमिका

वनविभागाकडून मात्र यामध्ये बघ्याची भूमिका घेण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान चायना मांजामुळे जखमी होण्याची अकोल्यातील ही पहिलीच घटना असून चायना मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाली नसल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.