ETV Bharat / state

अकोला कारागृहातील 523 जणांची कोरोना टेस्ट; 72 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

जिल्हा कारागृहातील कैदी व कर्मचारी अशा एकूण ५२३ जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यातील ४८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यात ७२ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

72 corona positive cases found in Akola Jail
अकोला कारागृहात ५२३ जणांची केली तपासणी
author img

By

Published : Jul 2, 2020, 8:54 PM IST

अकोला - जिल्हा कारागृहातील कैदी व कर्मचारी अशा एकूण ५२३ जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यातील ४८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यात ७२ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत सर्व अहवाल निगेटीव्ह आले असून, ३५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिली आहे.

अकोला जिल्हा कारागृहातील ७१ पुरुष व एक कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना व सर्वांच्या तपासण्या करण्याची कार्यवाही सुरु केली. त्यासाठी कारागृहातच बॅरेक क्रमांक पाचमध्ये स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे.

२२ जून रोजी २० कैद्यांना लक्षणे जाणवल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. २४ जून रोजी प्राप्त अहवालात १८ जण बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर २६ जून रोजी १३४ जणांच्या चाचणीनंतर त्यातील ५० जण बाधीत असल्याचे २८ जून रोजी प्राप्त अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर २७ जूनला १५४ पुरूष कैद्यांची, ३९ महिला कैदी, चार लहान मुले व दोन कर्मचारी असे १९९ जणांची तपासणी केली असता एक पुरुष बाधीत असल्याचे १ जुलैच्या अहवालात स्पष्ट झाले. २९ जूनला ५३ पुरुष , 5 महिला, ७५ कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी असे १३५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांचेही अहवाल १ जुलै रोजी प्राप्त झाले. त्यात दोन पुरुष कैदी व एक कर्मचारी असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ४८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ३५ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून प्राप्त झाली असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सांगितले.या सर्व बाधितांना कारागृहातच सर्व उपचार सुविधा देण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.