ETV Bharat / state

कोरोना: अकोला मध्यवर्ती कारागृहातून 60 बंदीवानांना जामिनावर घरी सोडले - अकोला बातम्या

कारागृहातील बंदीवानांची गर्दी कमी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यभरातील हजारो बंदीवान, जे ७ वर्षांच्या आतील शिक्षेस पात्र आहेत, अशांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अकोल्यातील मध्यवर्ती कारागृहातील 60 बंदीवानांना जामिनावर आज सोडण्यात आले.

अकोला
अकोला
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:35 PM IST

अकोला - गंभीर स्वरुपाचे गुन्हे नसलेल्या आणि ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल, अशा बंदीवानांना न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांसाठी तात्पुरत्या जामिनावर सोडले जात आहे. त्यामुळेच अकोल्यातील मध्यवर्ती कारागृहातील 60 बंदीवानांना जामिनावर आज सोडण्यात आले.

विशेष म्हणजे, त्यांना सोडण्याआधी सोमवारी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून घरीसुद्धा 'सोशल डिस्टन्सिंग' ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी कमी करणे, हा एक महत्त्वाचा उपाय आहे. राज्यातील सर्वच कारागृहे बंदीवानांमुळे खचाखच भरलेली आहेत. त्यातच एखाद्या बंदीवानास कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची लागण इतरांना होऊ शकते. त्यामुळे कारागृहातील बंदीवानांची गर्दी कमी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यभरातील हजारो बंदीवान जे ७ वर्षांच्या आतील शिक्षेस पात्र आहे, अशांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार अकोला मध्यवर्ती कारागृहातूनही 60 बंदीवानांना सोडण्यात आले. तत्पूर्वी त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना घरी 'सोशल डिस्टन्सिंग' ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्व बंदीवानांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.