अकोला - रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याच्या बातम्यांमुळे हवालदिल झालेल्या अकोलेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अकोल्यामध्ये 41 कोरोनाच्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज (बुधवारी) सकाळी आलेल्या अहवालानुसार 41 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोल्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 186 वर पोहोचली आहे. कृषी नगर, बैदपुरा, सिंधी कॅम्प, अकोट फाइल या परिसरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे हे क्षेत्र प्रशासनाने प्रतिबंधित केले होते. आरोग्य तपासणी करताना या क्षेत्रातील अनेक नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर यामधील 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- अकोला कोरोना अपडेट -
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 186
- मृतांची संख्या - 15
- डिस्चार्ज - 60
- अॅक्टीव्ह रुग्ण - 111