अकोला - कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्याभरात आज (सोमवार) 36 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तसेच, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, कोरोनावर मात केलेल्या 30 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिवसभरात 35 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यात 16 महिला व 19 पुरुष आहेत. त्यातील चार जण राणेगाव ता. तेल्हारा येथील, चार जण हिवरखेड येथील, चार जण पळसोबडे, तीन जण बोरगाव मंजू येथील दोन जण खदान, दोन जण नित्यानंद नगर, दोन जँ जुने शहर येथील तर उर्वरित शिवनी, शंकरनगर, तारफैल, निपाना कोठारी येथील रहिवासी आहेत. तसेच त्यात रामनगर अकोला येथील चार जण, राणेगाव तेल्हारा येथील दोन जण तर उर्वरित हिवरखेड, बाळापूर, पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
हेही वाचा - राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त
रविवारी रात्री एका 40 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्याण मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी असून ती 18 रोजी दाखल झाली होती. रविवारी रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आला होता. त्याचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्णात करण्यात आला आहे.
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 10 जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती :
प्राप्त अहवाल - 496
पॉझिटीव्ह - 35
निगेटीव्ह - 461
- आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल - 2 हजार 448
मृत - 102
डिस्चार्ज - 2 हजार 10
ॲक्टीव्ह रुग्ण - 336
महाराष्ट्रात प्रथमच दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त
राज्यात प्रथमच आज(सोमवार) कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली. आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर, ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.