अकोला - जिल्ह्यात आज (शुक्रवार) सायंकाळपर्यंत 182 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या तपासण्यांमधून 34 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 148 रुग्णांचे अहवाल हे कोरोना निगेटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडण्याची अकोल्यातील ही पहिलीच वेळ आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. या महिलेला 1 मे रोजी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा... COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..
अकोल्यात आज आलेल्या तपासणी अहवालात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यापैकी, 18 महिला (त्यात एक 12 वर्षांची मुलगी) आणि 16 पुरुष आहेत. यातील 18 रुग्ण हे बैदपूरा येथील रहिवासी असून, मोहम्मद अली रोड येथील 3 रहिवासी तर राधाकिसन प्लॉट, खैर मोहम्मद प्लॉट आणि सराफा बाजार या परिसरात प्रत्येकी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच जुना तारफैल, गुलजार पुरा, आळशी प्लॉट, मोमिन पुरा, भगतसिंग चौक माळीपुरा, जुने शहर आणि राठी मार्केट येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
अकोल्यातील कोरोनाची सद्यस्थिती :
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १२९
एकूण कोरोना रुग्ण मृत्यू - १२ (११ + आज १)
आता पर्यंत बरे झालेले रुग्ण (डिस्चार्ज मिळालेले) - १४
रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण (अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह) - १०३