अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णाचा एकूण आकडा दोन हजारांच्या वर पोहोचल आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसीय संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी अकोलाकरांनी संचार बंदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद पुढीत दिवसांतही देण्याचे आवाहन प्रशानाने केले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान जनता भाजी बाजार, सराफा बाजार, किराणा बाजार, टॉवर चौक यासह आदी ठिकाने बंद आहेत. मुख्य चौक, मुख्य रस्त्यावर तगडा पोलीस बंदोबस्त आहे. घरात राहणाऱ्या व घराबाहेर पडणाऱ्यांनी तीन गोष्टी कायम करत राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावणे तसेच सामाजिक अंतर पाळणे आणि वेळोवेळी हात धुतल्याने कोरोना होण्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे संचारबंदीच्या काळात घरी असला तरी या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.