अकोला - आज (शनिवारी) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 20 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्णांची संख्या आता 746 वर पोहोचली आहे.
शनिवारी जे 20 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत त्यात 13 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. त्यातील पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, दोन जण काला चबुतरा, दोन जण डाबकी रोड, तर ताज नगर, बालोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकड गंज माळीपुरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
तर सद्यस्थितीत 207 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवाल - 89
पॉझिटिव्ह - 20
निगेटिव्ह - 69
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 746
मृत - 34
डिस्चार्ज - 505
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 207