ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये शेततळ्यात बुडून इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

नितीन दिसत नसल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्यावर धाव घेतली. त्यानंतर नितीनला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

मृत नितीन एकनाथ नवले
author img

By

Published : May 4, 2019, 6:04 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेततळ्यातील पाणी काढण्यासाठी पाईप टाकताना पाय घसरल्याने आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नितीन एकनाथ नवले (वय ३३) असे मृताचे नाव आहे.

मालदाड गावात गोसावी मळा परिसरात नितीन नवले आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. सकाळी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी पाईप टाकत असताना त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. बराच वेळ झाला तरी पती घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने शेतात जाऊन बघितले असता नितीनची चप्पल शेततळ्याबाहेर दिसली. मात्र, नितीन दिसत नसल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्यावर धाव घेतली. त्यानंतर नितीनला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

नितीन पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:

Shirdi _Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे एका इंजिनिअर तरुणाचा शेततळ्यात पाणी काढण्यासाठी पाईप टाकताना पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शनिवारी (४ मे) सकाळी आठच्या सुमारास घडली. नितीन एकनाथ नवले (वय 33) असे या मयत तरुणाचे नाव आहे....

VO_ याबाबत समजलेली माहिती अशी की, मालदाड गावात गोसावी मळा परिसरात नितीन नवले आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. सकाळी आठच्या सुमारास तो आपल्या शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी पाईप टाकत असताना त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. बराच वेळ झाला तरी पती घरी न आल्याने त्याला शेततळ्यावर जावुन बघितले असता, नितीन याची चप्पल शेततळ्याच्या बाहेर दिसली मात्र नितीन दिसत नसल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्यावर धाव घेतली. काही वेळाने नितीनला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत....Body:4 April Shirdi Farmer Detha Conclusion:4 April Shirdi Farmer Detha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.