अहमदनगर - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर पत्रकारसंघा (प्रेस क्लब)च्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदर्श व्यवसायिक प्रदिपशेठ गांधी, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे नोबेल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर, आदर्श उत्कृष्ट सरपंच ढवळपुरी गावचे डॉ.राजेश भनगडे, आदर्श कृतीशील शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा, खांडकेगाव यांनाही पुरस्कारांनी गौरवण्यात आले. स्वर्गीय भास्करराव डिक्कर गतीपत्र पुरस्कार मखदूम (उर्दू) साप्ताहिकचे अबिदखान दुलेखान यांना देण्यात आला.
हेही वाचा - मस्तानी'च्या वंशजांनी पहिल्यांदाच पाहिला शनिवारवाडा..!
यावेळी जेष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण खोरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुभाष गुंदेचा, जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके हे उपस्थित होते. अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.