ETV Bharat / state

उच्च न्यायालयाद्वारा साईसंस्थानवर नियुक्त तदर्थ समितीविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शिर्डीतील साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी नेमण्यात आलेल्या तदर्थ समितीच्या कामकाजाविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू आहे.

agitator
आंदोलनकर्ते
author img

By

Published : Sep 7, 2020, 8:37 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरोधात शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने शिर्डी साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी चार सदस्यीय तदर्थ समितीची नेमणूक केली. मात्र, ही समितीही कामगारांचे प्रश्न सोडवत नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याची सुरूवात आज (दि. 7 सप्टें.) काळ्या फिती लावत कामावर हजर होत केली आहे.

बोलताना आंदोलनकर्ते
शिर्डीच्या साईबाबा संस्थान मधील कायम आणि कंत्राटी कर्मचार्यांच्या विवीध मागण्यांवर निर्णय होत नाही. विविध मागण्यांसाठी कामगार आणि लोकप्रतीनीधींनीही सध्या साई संस्थानवर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समीतीचे अध्यक्ष असलेले जिल्हा न्यायाधीश हे कर्मचारी तसेच शिर्डी ग्रामस्थांना भेटण्यास वेळ देत नसल्याने कर्मचारी आणि शिर्डीकर हैराण झाले आहेत. एकीकडे साईसंस्थानच्या तीनही कर्मचारी संघटनांनी एकत्रित येवून कृती समितीची स्‍थापना केली आहे. त्यांना आता माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि ग्रामस्थांनीही साथ दिली आहे.

आज कामगारांनी काळ्या फिती लावत कामकाज केला आहे. तर येत्या गुरुवारी (दि. 10 सप्टें.) साई संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ साई मंदिराच्या गेट क्रमांक चार समोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या गुरुवारी ग्रामस्‍थांच्‍या उपस्थितीत घंटानांद आंदोलन करुन महाआरती करण्‍यात येणार असून रविवारी (दि. 13 सप्‍टें.) शिर्डी ग्रामस्‍थांच्‍या वतीने मुकमोर्चा काढण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या आंदोलनानंतरही तदर्थ समितीला जाग आली नाही तर, लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी साई संस्थानचे कर्मचारी राजेंद्र जगताप आणि प्रताप कोते यांनी दिला आहे.

शिर्डी संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या विरोधात आज (सोमवार) मुख्‍यमंत्र्यासह विधी व न्‍याय विभागाच्‍या प्रधान सचिवांची भेट घेऊन साई संस्थान कर्मचाऱ्यांच्‍या तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या
प्रश्नांसदर्भातील सविस्‍तर निवेदन शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील देणार आहेत.

हेही वाचा - ...तर अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे आंदोलन - विखे-पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.