ETV Bharat / state

तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेताच शिर्डीत महिलांचा विजयोत्सव - shirdi news update

सकाळपासूनच मंदीर परिसराच्या बाहेर स्थानिक महिलांसह भाजपा, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तसेच पुणे व शिर्डी येथील ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी तृप्ती देसाई यांची वाटच बघत होते. अखेर देसाई यांना सुपा येथे पोलीसांनी अडवल्याचे वृत्त समजताच शिर्डीत महिलांनी विजयोत्सव साजरा केला.

शिर्डीत महिलांचा विजयोत्सव
शिर्डीत महिलांचा विजयोत्सव
author img

By

Published : Dec 11, 2020, 3:37 AM IST

Updated : Dec 11, 2020, 6:47 AM IST

अहमदनगर - शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नगर जिल्ह्याच्या सीमेवरच ताब्यात घेतले आले होते. देसाई यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शिर्डीतही मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते जमा झाले होते. देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच साईनगरीत काल फटाके फोडून व एकमेकींना पेढे भरवून विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे.

देसाई यांच्या आक्षेपावर शिर्डीत तिव्र प्रतिक्रीया-

साई दर्शनासाठी सभ्य पेहराव करून येण्याचे आवाहन साई संस्थानने फलकाद्वारे केले होते. या निर्णयाचे भाविकांनी उत्स्फुर्त स्वागत केले असतांनाच तृप्ती देसाई यांनी मात्र संस्थानच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. संस्थानला मंदीरातील अर्धनग्न पुजारी कसे चालतात, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थीत केला होता. संस्थानने फलक हटवले नाही तर १० डिसेंबरला येवून फलक काढून टाकण्याची धमकीही तृप्ती देसाई यांनी दिली होती. देसाई यांच्या आक्षेप व विधानावर शिर्डीत तिव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. येथील शिवसेना, भाजप, मनसे महिला आघाडी तसेच ब्राह्मण महासंघाने देसाई यांना शिर्डीत येवून फलक काढूनच दाखवावा, असे प्रतिआव्हान दिले होते. प्रसंगी तोंडाला काळे फासण्याचा व चांगला धडा शिकवण्याचा इशाराही देण्यात आला होता.

शिर्डीत महिलांनी साजरा केला विजयोत्सव -

यामुळे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांना नोटीस बजावून शिर्डीत येण्यास प्रतिबंध केला होता. तरीही त्यांनी आदेश झुगारून शिर्डीत येण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे शिर्डीत व जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. सकाळपासूनच मंदीर परिसराच्या बाहेर स्थानिक महिलांसह भाजपा, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तसेच पुणे व शिर्डी येथील ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी तृप्ती देसाई यांची वाटच बघत होते. अखेर देसाई यांना सुपा येथे पोलीसांनी अडवल्याचे वृत्त समजताच शिर्डीत महिलांनी विजयोत्सव साजरा केला.

या विजयोत्सवात भाजपाच्या नगरसेविका वंदना राजेंद्र गोंदकर, छाया शिंदे, रंजना सावंत, मनीषा शिंदे, शिवसेनेच्या स्वाती कूमावत तसेच रेखा वैद्य, प्रतिभा गोंदकर, रूपाली तांबे, तनुजा गोंदकर, मिनाक्षी डूबल, उषा कुमावत, आशा परदेशी, किर्तना रेड्डी, शिवाजी चौधरी, विजय काळे, सुनील परदेशी, नानक सावंत्रे, ब्राह्मण महासंघाचे संतोष दवे, पाटील आदींची उपस्थीती होती. देसाई यांनी आता तरी धडा घ्यावा व पुन्हा आगळीक करू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा- 'राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवारांमध्ये'

हेही वाचा- प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल एका वर्षानंतर अटक

Last Updated : Dec 11, 2020, 6:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.