अहमदनगर - नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे मुळा उजव्या कालव्यात कपडे धुवत असताना पाय घसरल्याने एक महिला पाण्यात वाहुन गेली होती. तब्बल 20 तासांच्या शोध मोहिमेनंतर पाण्यात वाहून गेलेल्या त्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.
हेही वाचा... पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील तिरमल वस्तीवर राहणाऱ्या शैला जालिंदर भिंगारे (35) ही महिला मुळा उजव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरल्यामुळे ती महिला पाण्यात पडून वाहून गेली. तिला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मुळा उजव्या कालव्याचे पाणी देखील कमी करण्यात आले. कालव्यातील पाण्याची पातळी निम्म्याहून कमी झाल्यावर सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. ही महिला पाण्यात पडल्याच्या ठिकाणापासून 15 ते 20 तरूणांनी साखळी करत, कालव्यातील पाण्यात चालत जात शोध घेतला. त्यावेळी सकाळी 11 वाजता घटना स्थळापासून 500 ते 600 मीटर अंतरावर कालव्यातील एका झुडपाला महिलेचा मृतदेह अडलेल्या अवस्थेत सापडला. महिलेचा मृतदेह कालव्याबाहेर काढून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे.
हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार