ETV Bharat / state

भावाच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, कोपरगावातील धक्कादायक घटना

पती सारखा त्रास देतो म्हणून भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात समोर आली आहे.

author img

By

Published : Jun 24, 2021, 4:28 PM IST

धक्कादायक घटना
धक्कादायक घटना

अहमदनगर - पती सारखा त्रास देतो म्हणून भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात समोर आली आहे. पतीला आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन नंतर दोरीने गळा आवळून पती शिवनारायन नानाभाऊ संवत्सरकर याचा खून केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

भावाच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, कोपरगावातील धक्कादायक घटना

पत्नीने भावाच्या मदतीने रचला कट

याबाबत आरोपी पत्नी जयश्री संवत्सरकर व तीचा हर्सूल कारागृहातील भाऊ किरण कैलास ढोणे यांना कोपरगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आज कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी पत्नी जयश्री संवत्सरकर व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

..यामुळे घेतला पतीचा काटा काढण्याचा निर्णय

आरोपी महिला जयश्री संवत्सरकर व मृत पती शिवनारायन यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद होत होते. मृत शिवणारायन दारू पिऊन पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होता व तो तिचा काटा काढणार असल्याचा तिला संशय आला. यामुळे तिने अखेर पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी हर्सूल येथील कारागृहात सेवेत असलेल्या भावाला बोलावून घेतले होते.

आधी विजेचा शॉक दिला, गळा आवळून केला खून

दरम्यान, रविवार दि.६ जून रोजी पत्नी जयश्री व तिच्या भावाने रात्रीच्या सुमारास आपल्या पतीला आधी केबलच्या साहायाने विजेचा शॉक दिला. त्या शॉकने काही अंशी मूर्च्छित झाल्यावर त्याचा जीव गेलेला नाही ही जाणीव झाल्यावर त्याला चार पदरी दोरीच्या साहायाने गळफास दिला. कोपरगाव शहर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दारूच्या नशेत मृताने विजेचा शॉक घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली होती. मात्र पोलीस तपासात व मृताच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आली होती. त्यावरून अधिकाऱ्यांनी तपास केला असता ही खूनाची बाब उघड झाली.

आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

त्यावरून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या व आज कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला व त्यानंतर त्यांना दि.२८ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

हेही वाचा - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.