ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी - पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला

चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नी आणि भांडण सोडविण्यास आलेल्या सासूवर पतीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली.

ahemadnagar
चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी
author img

By

Published : Feb 16, 2020, 1:54 PM IST

अहमदनगर - चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नी आणि भांडण सोडविण्यास आलेल्या सासूवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली. या हल्ल्यात दोघीही जखमी झाल्या असून त्यांच्यावर संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; हल्ल्यात पत्नी अन् सासू गंभीर जखमी

हेही वाचा -

कौटुंबिक वादातून पोलीस मुख्यालयासमोर पेटवून घेत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

भिका किसन भूतांबरे आणि कमल यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले देखील आहेत. मात्र, भिका हा व्यसनाधीन असल्याने दारू पिऊन पत्नी कमलच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. दोघांमध्ये यावरुन सतत वाद होत असत .कमलच्या माहेरच्या नातेवाईकांनी वेळोवेळी त्यांच्यातील वाह सोडवले होते. मात्र, शुक्रवारी (दि .14 फेब्रुवारी) कमल आणि पती भिका हे दोघेही कमलच्या माहेरच्या नात्यातल्या लग्नासाठी केदारवस्ती दरेवाडी संगमनेर येथे आले असता सायंकाळी लग्न झाल्यानंतर दोघेही मुक्कामी थांबले होते.

हेही वाचा -

'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'

रात्री जेवण झालेनंतर भिका हा घरातून निघून गेला. शानिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याने घरी येऊन झोपलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीच्या सहाय्याने हल्ला केला. हा आवाज ऐकून त्याची सासू सिंधुबाई केदार या जाग्या झाल्या असता त्यांच्यावरही त्याने कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरड झाल्यानंतर इतर लोकांनी भिका याला पकडून ठेवले. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे आणि घारगाव पोलीसांनी आरोपी भिकाला अटक केली. दरम्यान, पत्नी आणि सासुच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी संगमनेर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.