ETV Bharat / state

'महाराष्ट्राची ऑक्सिजन ट्रेन सुरतला का गेली'? - थोरातांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा अहमदनगर

राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने आणि त्याभावी रुग्णांचे जीव धोक्यात असतानाही विशाखापट्टणम येथून निघालेली ऑक्सिजन ट्रेन उशिरा महाराष्ट्रात दाखल झाली. ट्रेन सुरतला गेली मग तिकडून इकडे आली, असे का झाले हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरातांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा

author img

By

Published : Apr 24, 2021, 5:00 PM IST

अहमदनगर - राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने आणि त्याभावी रुग्णांचे जीव धोक्यात असतानाही विशाखापट्टणम येथून निघालेली ऑक्सिजन ट्रेन उशिरा महाराष्ट्रात दाखल झाली. ट्रेन सुरतला गेली मग तिकडून इकडे आली, असे का झाले हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करून, सुरू असलेल्या छापेमारीबद्दल आपल्याला माहित नाही म्हणत, त्यांनी यावर बोलणे टाळले.

जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे जिल्ह्याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. विखे हे सध्या विरोधीपक्षाचे जेष्ठ आमदार आहेत, कदाचित ते नैराश्यात असावेत, आणि काहीतरी टीका करणे गरजेचे वाटत असल्याने ते सध्या टीका करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

थोरात अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे एकेक मंत्री आहेत, पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत. असे एकूण चार मंत्री जिल्ह्यासाठी असताना कोरोनाचा कहर वाढत असताना हे सर्व मंत्री कुठे आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षातून उपस्थित केला जात आहे. जिह्यातील मंत्री केवळ आपल्या मतदारसंघात येतात आणि मुबंईला निघून जातात, तर पालकमंत्री महिना-महिना जिल्ह्याकडे फिरकत नाहीत, आल्यावर आढावा बैठक, पत्रकार परिषद घेऊन ते काही तासांत निघून जातात. एकूणच या चर्चेवर माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच टीका केली होती. मागील शनिवारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिर्डी आणि अहमदनगर इथे आढावा बैठक घेतली, त्यानंतर इतर तीनही मंत्र्यांनी काही बैठका घेतल्या. तर आज थोरात यांनी नगर, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूरमध्ये जाऊन कोरोनाचा आढावा घेतला.

बाळासाहेब थोरातांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा

'महाराष्ट्राने आकडे लपवले नाहीत'

महाराष्ट्राने कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूसंख्या असे कोणतेच आकडे लपवलेले नाहीत. मात्र गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या ठिकाणी भयावह परस्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढत आहे. अशात रेमडेसीविर इंजेक्शन, ऑक्सिजन आदींचा तुटवडा आहे, त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती थोरात यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - तहसीलदार व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने रोखला गेला बालविवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.