अहमदनगर - काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी सकाळी 10 वाजता शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल आहेत. सकाळी 9 वाजता साई समाधीचे दर्शन घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन रॅली काढत राहता तहसील कार्यालयात विखे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील.
हेही वाचा - शिर्डीत विखे-पाटील विरोधात सुधीर तांबे ?
संगमनेरमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा विखे पाटलांनी केला होता. तर खासदार सुजय विखे यांनीही संगमनेरमधून विखे घरातील सदस्यच भाजपकडून उमेदवार असेल असे सांगितले होते. त्यामुळे विखेंनी संगमनेरमध्ये विशेष लक्ष घातले होते. थोरातांना शह देण्यासाठी गावोगावी सभा घेतल्या. या जागेसाठी विखेंनी भाजपमध्ये आपले राजकीय वजन वापरले होते. परंतु संगमनेर विधानसभेची जागा युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे गेल्याने शिवसेनेने याठिकाणी नवले यांना उमेदवारी दिलीआहे. त्यामुळे विखे पाटलांनी केलेला दावा फसला आहे.
हेही वाचा - शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. थोरातांचे मेहुणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबे हे दोघेही विखे पाटलांच्या विरोधात उमेदवारीसाठी इछुक आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिर्डी मतदारसंघातुन विखे पाटलांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा - राहुरीतून शिवाजी कर्डीलेच, नगराध्यक्ष कदम बंडाच्या दिशेने