ETV Bharat / state

शिर्डी नंगरपचायतच्या पाण्याची चोरी; एकास अटक

शिर्डी नगरपंचायतच्या पाणी साठवण तलावातून शेजारी असलेल्या विहिर मालकाने त्याच्या विहीरीत आडवा बोर मारत पाणी चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याच तलावातून पाणी चोरी झाली
author img

By

Published : Jul 7, 2019, 5:31 PM IST

अहमदनगर - शिर्डी नगरपंचायतच्या पाणी साठवण तलावातून शेजारी असलेल्या विहीर मालकाने त्याच्या विहिरीत आडवा बोर मारत पाणी चोरल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डीत पाणी चोरी

पाणी साठवण तलावाची पाणी पातळी खाली गेल्याचे कर्मचाऱ्यास लक्षात आले. त्यानंतर तपास केला असता ही बाब समोर आली असल्याचे नगरपंचायतचे मुख्यअधिकारी सतिषे दिघे यांनी सांगितले. या संदर्भात दिघे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून शिर्डी पोलिसांनी विठ्ठल दाभाडे यांच्या विरोधात पाणी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आले आहे.

शिर्डी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतचा नादुर्खी येथील साठवण तलावा शेजारील विठ्ठल दाभाडे यांनी गेल्या ८ दिवसांपूर्वी आपल्या विहीरीत आडवा बोर घेऊन नगरपंचायतचा अख्खा साठवण तलाव खाली केला असल्याचा प्रकार शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱयांच्या लक्षात आल्यावर या घटनेची माहिती मुख्याधिकारी यांना दिली होती.

त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत साई संस्थानच्या आणि नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा तलावाजवळ अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी असून या विहीरीत तलावाचे पाणी पाझरुन येत असते. मात्र, आता या शेतकऱ्याने थेट बोर मारुनच पाणी चोरल्याच समोर आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी नगरपंचायतच्या पाणी साठवण तलावातून शेजारी असलेल्या विहिर मालकाने त्याच्या विहीरीत आडवा बोर मारत पाणी चोरल्याची घटना समोर आलीय..या व्यक्तीच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

VO_पाणी साठवण तलावाची पाणी पातळी खाली गेल्याचे कर्मचाऱ्यास लक्षात आले आणि त्यानंतर तपास केला असता ही बाब समोर आली असल्याच नगरपंचायतचे मुख्यअधिकारी सतिषे दिघे यांनी या संदर्भात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून शिर्डी पोलिसांनी विठ्ठल दाभाड़े यांच्या विरोधात पाणी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आले आहे....

VO_शिर्डी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतचा नादुर्खि येथील साठवन तलावा शेजारिल विठ्ठल दाभाड़े यांनी गेल्या 8 दिवसा पूर्वी आपल्या विहीरीत आडवा बोर घेऊन नगरपंचायतचा अखा साठवन तलावा खाली केला असल्याचा प्रकार शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचार्यांच्या लक्षात आल्यावर या घटनेची माहिती मुख्याधिकारी यांना दिली
त्या नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीत साई संस्थानच्या आणि नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा तलावा जवळ अनेक शेतकर्यींच्या विहीरी असुन या विहीरीत तलावाच पाणी पाझरुन येत असत..मात्र आता या शेतकर्याने थेट बोर मारुनच पाणी चोरल्याच समोर आलय....Body:MH_AHM_Shirdi_Water Theft_07_PKG_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Water Theft_07_PKG_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.