अहमदनगर- पारनेर तालुक्यातील आळेपाडळी, देवीभोयरेफाटा ते निघोज रस्त्याचे काम ग्रामस्थांनी काल (बुधवारी) बंद पाडले. निकृष्ठ काम होत असल्याचा आरोप करत ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे आल्याने हे काम बंद पाडण्यात आले. प्रशासनाने याप्रश्नी लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
हेही वाचा- तरुणावर अनैसर्गिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना अटक
रस्त्याचे टॅककोट चांगले नाही, निकृष्ठ काम, डांबराचा कमी वापर यामुळे देवीभोयरे ते भोयरे फाट्यावर रस्ता पुन्हा उखडला असल्याचे देवीभोयरे, वडझिरे, व भोयरे फाट्यावरील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एस. एस. कन्स्ट्रक्शनचे गुत्तेदार संजय गुंदेचा हे करत आहेत. ४ कोटी रुपयांचा हा रस्ता आहे. रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांनी ठेकेदारांच्या लक्षात आणून दिले होते. मात्र, त्यानंतरही कामात सुधारणा होत नसल्याचा परिसरातील ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून काम बंद पाडले. आमदार निलेश लंके आणि गुत्तेदार गुंदेचा आल्या शिवाय काम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला होता. यावेळी शिवाजी सरडे, संजय एरंडे, कैलास चौधरी यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रशासनाने याप्रश्नी लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.