ETV Bharat / state

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचा वाहन मोर्चा

दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन व्यापक करण्यासाठी राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्चा काढण्यात येणार आहे. यात राज्यातील 21 जिल्ह्यांतून 20 हजारांहून शेतकरी सहभागी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, संगमनेर आणि अकोले तालुक्यातुनही मोठ्या प्रमाणात नाशिककडे शेतकरी रवाना होणार आहेत.

किसान सभेचा वाहन मोर्चा
किसान सभेचा वाहन मोर्चा
author img

By

Published : Jan 23, 2021, 1:21 PM IST

अहमदनगर - दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन व्यापक करण्यासाठी राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्चा काढण्यात येणार आहे. यात राज्यातील 21 जिल्ह्यांतून 20 हजारांहून शेतकरी सहभागी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, संगमनेर आणि अकोले तालुक्यातुनही मोठ्या प्रमाणात नाशिककडे शेतकरी रवाना होणार आहेत. अकोले येथील शेतकरी ठिकठिकाणी आता जमायला सुरूवात झाली आहे. अकोले येथुन निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे नेते अजीत नवले हे करणार आहेत. या वाहन मोर्चाबाबत अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अजित नवले त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनीधी रविंद्र महाले यांनी.

किसान सभेचा वाहन मोर्चा
राज्यपाल भवनावर आंदोलनदिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनावर आंदोलन करणार असल्याची माहिती डॉ नवले यांनी दिली आहे. हा वाहन मोर्चा उद्या मुंबईतील आझाद मैदान येथे पोहोचणार आहे. राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. राज्यातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा काढणार असल्याची माहिती डॉ अजित नवले यांनी दिली आहे.

सर्व डावे पक्ष
सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस माजी खासदार हनन मोल्ला या सभेला संबोधित करणार आहेत. सभेनंतर येथे जमलेले हजारो आंदोलक दुपारी 2 वाजता राजभवनाकडे कूच करून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.

मंगळवारी प्रजासत्ताकदिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गायन होऊन शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. राज्यातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील होणार आहेत.

  • राज्यपालांकडे या मागण्या मांडणार -
    शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा
    शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा.
    वीज विधेयक मागे घ्या.
    कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा.
    वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा.
    महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या.
  • हेही वाचा- देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात, 26 जानेवारीपासून होणार सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.