ETV Bharat / state

अर्धवट उपचारानंतर डिस्चार्ज घेवून सेंटर बाहेर पडलेल्या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू - corona in shirdi

कोवीड रूग्णाचा बाहेर मृत्यू झाल्याने घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर डॉ मैथिली पितांबरे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, शिर्डी नगरपंचायतचे मुख्य लिपीक मधुकर देसले आदींनी तातडीने घटनास्थळी जात परिस्थीती हाताळली.

अर्धवट उपचारानंतर डिस्चार्ज घेवून सेंटर बाहेर पडलेल्या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू

author img

By

Published : Mar 20, 2021, 10:14 PM IST

शिर्डी - मध्यप्रदेश राज्यातील असलेले अहीरराव कुटुंब गेल्या काही दिवसांपासुन साईबाबा संस्थानच्या बांधकाम प्रकल्पावर ठेकेदाराकडे काम करत आहेत. या कुटुंबातील साठ वर्षीय नथुराम दलवा अहीरराव यांना दोन तीन दिवसापुर्वी त्रास होत असल्याने साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोवीड टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना संस्थानच्या कोवीड रूग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र ते आपल्या नातेवाईकाकडे जाण्याचा हट्ट धरत होते. आज सकाळी त्यांची सुन जेवण घेवून गेली असता डॉक्टरांनी डिस्चार्ज घ्यायला सांगितले. त्यानुसार डिसचार्ज घेवून बाहेर आल्यावर त्यांचा मृत्यू झाला असे मयताचा नातू देसराम यांनी सांगितले आहे.

अर्धवट उपचारानंतर डिस्चार्ज घेवून सेंटर बाहेर पडलेल्या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू
कोवीड रूग्णाचा बाहेर मृत्यू झाल्याने घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर डॉ मैथिली पितांबरे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, शिर्डी नगरपंचायतचे मुख्य लिपीक मधुकर देसले आदींनी तातडीने घटनास्थळी जात परिस्थीती हाताळली. यानंतर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शिर्डीतील अमरधाम येथे या मयतावर अंत्यसंस्कार केले.

रूग्णाला नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला-

साई संस्थानच्या कोवीड रूग्णालयात हा रूग्ण उपचार घेत होता. नातेवाईकांनी त्याला डिस्चार्ज देण्याचा आग्रह धरल्याने सेंटरवरील डॉक्टरांनी या रूग्णाला नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला. यानंतर ते येथून बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जातांना या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असल्याची माहिती साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ मैथिली पिंताबरे यांनी दिली आहे.

कारवाई करण्याची मागणी-

हा घडलेला एकूण प्रकार गंभीर असून अशाप्रकारे कोरोणाग्रस्त रुग्ण बाहेर कसा पडला, त्याला कोणी सोडले, यात कोणाचा दोष आहे. नातेवाईकांच्या आग्रहास्तव अशाप्रकारचे रुग्ण सोडता येतो का? या सर्व बाबी पहाता यासंबंधी सर्व प्रकरणाची चौकशी होऊन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा- आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.