ETV Bharat / state

Shirdi : उद्धव ठाकरेंनी बोलताना भान ठेवावे; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सल्ला - उध्दव ठाकरे

उध्दव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आहेत. बोलताना त्यांनी भान ठेवले पाहीजे. परंतू, चिखली येथील सभेतील त्‍यांचे वक्तव्य हे कमीपणा दाखवणारे असून असाच वाचाळपणा करीत राहीलात तर एकटे पडाल असा खोचक सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil criticizes Uddhav Thackeray) यांनी दिला.

Shirdi
उद्धव ठाकरेंनी बोलताना भान ठेवावे; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सल्ला
author img

By

Published : Nov 27, 2022, 3:51 PM IST

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मन की बात या कार्यक्रमाचा ९५ वा भाग मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांसमवेत पाहिल्‍यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना बुलढाणा येथील जाहीर सभेत वीज प्रश्नावरुन उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार (Radhakrishna Vikhe Patil criticizes Uddhav Thackeray) घेतला. मंत्री विखे पाटील म्हणाले की, सत्‍ता गेल्याचा थयथयाट समजू शकतो परंतू चिडचिड करून आपण काय बोलतो याचे भान ठाकरेंना राहिले नाही.

अन्यथा एकटे पडला : मागील अडीच वर्षांत शेतकरी आठवला नाही. केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता करता आली नाही, तुम्ही तर बांधावर जावून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे पाप केले असल्याची आठवण करून देत मंत्री विखे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत. तरीही उध्दव ठाकरे यांनी पातळी सोडून केलेले भाषण हे त्यांचाच कमीपणा दाखवणारे आहे. असाच वाचाळपणा करीत राहीलात तर एकटे पडाल असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा उध्दव ठाकरे यांचा आरोप खोटा ठरवताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्ष राज्यात सरकार नावाची व्यवस्था होती काॽ कोव्हीड संकटात शेतकऱ्यांना आणि जनतेला कोणतीच मदत तुम्‍ही मुख्यमंत्री असताना झाली नाही. प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा मिळाला अन्यथा काय हाल झाले असते याकडे लक्ष वेधत उध्दव ठाकरे यांनी बोलताना याची जाणीव ठेवली पाहीजे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

कामाख्‍या देवीच्‍या दर्शनाचे समर्थन : मुख्‍यमंत्री (CM Eknath Shinde) आणि त्‍यांच्‍या सहकारी आमदारांनी घेतलेल्‍या कामाख्‍या देवीच्‍या दर्शनाचे समर्थन करताना ना.विखे पाटील म्‍हणाले की, एक‍नाथ शिंदे या राज्‍याचे मुख्‍यमंत्री झाले हेच त्‍यांचे भविष्‍य होते. यामुळे मुख्‍यमंत्र्यांनी आधिच हात दाखवून टाकला आहे. तो कोणाच्‍या गालावर आणि कोणाच्‍या पाठीवर पडला हे सांगण्‍याची आता गरज राहीलेली नाही. जनतेने सुध्‍दा राज्‍यातील भविष्‍य ठरविले आहे. पुढचे २० वर्षे आमचेच सरकारच सत्‍तेवर राहील असा दावाही त्‍यांनी केला.

गेवराई येथील तहसिलदारांनी पोलीस संरक्षणाच्या केलेल्या मागणीची गंभीर दखल आपण घेतली असून, त्यांना धमकी देणा-या वाळू माफीयांवर वेळ पडली तर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्या असल्याचे स्पष्ट करून राज्यात वाळू तस्करीवर नियंत्रण आले असून वाळू आणि खाण माफीयांवरही लगाम बसविण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

वाळू अभावी निळवंडे कालव्यांची काम बंद पडल्याचा केवळ गैरसमज पसरवणा-यांनी आपण कोणाची वकीली करीत आहोत हे लक्षात घ्यावे, कोणतीही काम बंद नाहीत. याबाबत आपण कंत्राटदार आणि अधिका-यांना एकत्रितपणे बोलून नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घेणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांच्या आडून माफीयांची एजंटगिरी करून कोणी संधी साधू इच्छित असेल तर ते आपण होवू देणार नाही असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.