अहमदनगर - राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसद्वारे संवाद साधला आहे. ब्राम्हणी येथून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आज शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात आला. आज सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कर्जमाफीची यादी जाहीर झाली. यानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फटाके वाजवून तसेच एकमेंकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.
महाविकास आघाडी सरकारने पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थींची यादी जाहीर केली. यावेळी तहसीलदार फसोद्दीन शेख, उपनिबंधक दीपक नागरगोजे, महसूल मंडळ अधिकारी चांद देशमुख, सोसायटीचे सचिव अशोक आजबे, कामगार तलाठी संजय डोके, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.