ETV Bharat / state

कोरोना अपडेट : जामखेडमधील आणखी दोन जणांना लागण, रुग्णसंख्या ३३ वर - corona in maharashtra

काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

जामखेडमधील आणखी दोन जणांना लागण
जामखेडमधील आणखी दोन जणांना लागण
author img

By

Published : Apr 23, 2020, 7:32 AM IST

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधित जामखेड येथील आहेत.

काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या आता ३३ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. सध्या बूथ हॉस्पीटलमध्ये ९ जण उपचार घेत आहेत. तर, या बाधित दोन रुग्णांना आता तिथे हलवले जाणार आहे.

जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचा २९ आणि ३५ वर्षीय मुलं बाधित असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.