अहमदनगर- जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लोणी आणि मुकुंदनगर येथील दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना नगर शहरातील बूथ (कोव्हिड) हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजमितीला ३१ रुग्ण कोरोनाबधित होती. यापैकी आतापर्यंत तब्बल २० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दोन रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे बूथ हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.