ETV Bharat / state

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा अपघात - Ahmednagar District Latest News

संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राष्ट्रीय महामार्गावरून संत्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने, ट्रक महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाला. चालकाच्या दक्षतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. हा अपघात मंगळवारी साडेअकराच्या सुमारास घडला, या अपघातात ट्रकमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा अपघात
ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा अपघात
author img

By

Published : Feb 2, 2021, 6:10 PM IST

संगमनेर (अहमदनगर) संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राष्ट्रीय महामार्गावरून संत्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने, ट्रक महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाला. चालकाच्या दक्षतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. हा अपघात मंगळवारी साडेअकराच्या सुमारास घडला, या अपघातात ट्रकमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा अपघात

पोलीस घटनास्थळी दाखल

या बाबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक (आर.जे. २७ जी.सी. १६६४) हा नाशिक येथून १६ टन संत्रे घेऊन संगमनेर मार्गे पुण्याच्या दिशेने जात होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ट्रक बोटा शिवारातील आळेखिंड परिसरात आला असता ट्रकचे ब्रेक निकामी झाले. ब्रेक निकामी झाल्याने ट्रक मागे येऊन एका शेतात पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक शेतातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी क्रेनला पाचारण केले. दरम्यान ट्रक पलटी झाल्याने संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.