ETV Bharat / state

Tourist Places closed : आजपासून कळसुबाई, भंडारदरा पर्यटनस्थळांसह महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी - अहमदनगर पर्यटन स्थळ

कळसुबाई ( Kalsubai ) हे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण असुन पर्यटकांचा ओढा शिखरावर मोठ्या प्रमाणात असतो कळसुबाई शिखर चढाईसाठी आज बुधवारी गावपातळीवर विशेष बैठकीचे आयोजन केले गेले असुन कळसुबाई बंदचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आल्याची माहिती बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे यांनी दिली आहे.

पर्यटकांना आजपासून बंदी
पर्यटकांना आजपासून बंदी
author img

By

Published : Jan 12, 2022, 2:27 PM IST

अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटनस्थळासह ( Bhandardara Tourist Place ) परिसरातील महत्वाच्या निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात ( Tourist Places in Ahmednagar District Closed ) आल्याचा निर्णय मंगळवारी वनविभागाने घेतला आहे. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचे वनविभागाने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

कळसुबाई, भंडारदरा पर्यटनस्थळांसह महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आजपासून बंदी

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्वाचे निसर्ग पर्यटन समजले जाते. या पर्यटन क्षेत्रात अर्थात भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवर सांदनदरी, रतनगड, अमृतेश्वर मंदिर, घाटघरचा कोकणकडा, अलंग - कुलंग - मलंग हे किल्ले वन्यजीव विभागाच्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात येतात. नुकतेच काही महिणन्यांपुर्वी पर्यटनास खुले करण्यात आले होते. भंडारद-याचा टेंट व्यवसायही जोमाने पुन्हा सुरु होऊन पर्यटनाची भरभराटी होऊ लागली होती. स्थानिकांची रोजी रोटी पुन्हा उभारी धरु लागली होती. पंरतु कोरोनाची तिसरी लाट पुन्हा डोके वर काढु लागल्याने तिला आवर घालण्यासाठी राज्य शासनाकडुन पर्यटनास पुन्हा बंदी घातली गेली. मंगळवारी भंडारद-यांच्या वनविभागाच्या विश्रामगृहावर वन्यजीव कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्या अधिपत्याखाली परिसरातील अभयारण्य क्षेत्रातील सरपंच, वनकमिटी सदस्य, टेंटधारक व पत्रकार बांधवांच्या उपस्थित बैठक पार पडली.

अन्यथा दंड वसूल करणार -

अभयारण्यात असलेल्या पर्यटनस्थळावर कोणत्याही पर्यटकास प्रवेश मिळणार नाही. टोलनाक्यांपासुन सर्व पर्यटकांना परत पाठविले जाईल. तरीही पर्यटक अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करुन गेलाच तर ज्या ठिकाणी पर्यटक किंवा त्यांची गाडी आढळून येईल त्या गावातील वनकमिटी पर्यटकांकडुन प्रत्येकी 500 रु दंड वसुल करुन आहे. तेथुन परत पर्यटकांना माघारी पाठविले जाईल. यावेळी या बैठकीसाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल रविंद्र सोनार, सचिन धिंदळे, भास्कर मुठे , महिंद्रा पाटील ,रतनवाडीचे सरपंच संपत भांगरे , संजय सोनवणे , लक्ष्मण पोकळे यांच्यासह अनेक टेंटधारक उपस्थित होते.

दोन डोस झालेल्यांना परवानगी द्या -

भंडारदरा परिसरात आदिवासी बांधवांचे वास्तव्य असुन त्यांची पर्यटन व्यवसायावर उपजिविका अवलंबुन आहे. दोन वर्षांपासुन कोरोनाने कहर केल्यापासुन या आदिवासी बांधवांना उपजिविकेसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाने आदिवासी बांधवांचा विचार करुन पर्यटनासंबधी नियमात शिथिलता आणावी. ज्या पर्यटकांच्या लसीकरणाचे दोन डोस पुर्ण झालेले आहे, त्यांना आरोग्य खात्याच्या सर्व नियमांचे पालन करत पर्यटनास परवाणगी देण्यात यावी, अशी मागणी शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे यांनी केली आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण असुन पर्यटकांचा ओढा शिखरावर मोठ्या प्रमाणात असतो कळसुबाई शिखर चढाईसाठी आज बुधवारी गावपातळीवर विशेष बैठकीचे आयोजन केले गेले असुन कळसुबाई बंदचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आल्याची माहिती बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.