अहमदनगर - अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पर्यटकांची गाडी बुडाली. ही घटना काल मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. यात कार चालक सतीश घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कोल्हापूर भागातील उद्योजक समीर राजूरकर व गुरू सत्यराज शेखर हे पर्यटक आपल्या कारमधून पुण्याहून अकोले तालुक्यातील कळसुबाई येथे पर्यटनाला आले होते. काल उशिरा रात्री दोनच्या सुमारास पर्यटक रस्ता चुकल्याने ते कोतुळ-अकोले रस्त्यावरून जात होते. रस्त्यावरील पूल धरणाच्या पाण्याखाली अल्याने पुलावरून कार जात असताना ती पाण्यात बुडाली.
या दुर्घटनेत चालक सतीश घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दोघे उद्योजक यांना पोहोता येत असल्याने ते सुखरूप किनारी पोहोचले. चालक सतीश घुले यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. पुलावर पाणी असताना पाटबंधारे व बांधकाम खात्याने पुरेशे दिशादर्शक फलक न लावल्याने ही घटना घडल्याचे समजले.
हेही वाचा - शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर