शिर्डी : सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याऱ्या साईंच्या महानिर्वाणास आज 104 वर्षे पुर्ण झाले (Today 104 years of Sai Baba Samadh) आहे. शिर्डीत एका फकीराच्या रुपात प्रकटलेल्या साईंनी जवळपास 60 वर्षे शिर्डीत वास्तव्य करत 15 आँक्टोबर 1918 रोजी अर्थात विजया दशमीला आपले अवतारकार्य (Sai Baba Samadhi special report) संपवले. सुमारे 104 वर्षापुर्वीचा निर्वाणाचा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भाविकाला जसा हळवा व भावुक करणारा आहे, तसाच उत्सुकता वाढवणाराही आहे़.
फकिराचे साई म्हणून स्वागत - 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डीत निंबवृक्षाखाली एक फकीर अवतरला. त्यांच्या वास्तव्याने या निंब वृक्षाच्या एका फांदीची पानेही गोड झाली. काही दिवसानंतर हा फकीर शिर्डीतून गायब झाला व पुन्हा धूपखेड्याच्या चांद पाटलाच्या वऱ्हाडातून शिर्डीत परतला. शिर्डीतील खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी या फकिराचे साई म्हणून स्वागत केले. तेव्हापासून त्यांना साई संबोधले जाऊ लागले नंतरच्या काळात ते सगळ्या जगाचे साई झाले.
सबका मलिक एक - म्हाळसापतींनी साईची ओळख आपले मित्र काशीराम शिंपी व अप्पा जागले यांच्याशी करून दिली. या तिघांनी साईची एका पडक्या मशिदीत राहण्याची व्यवस्था केली. जिथं भटकी कुत्रीही फिरकत नसत, अशी ही जागा साफसूफ करून तेथे राहू लागले. त्यांनी तिथे धुनी पेटवली. ते या वास्तूला द्वारकामाई म्हणत. पायघोळ कफनी घालणारे व डोक्याला पांढरे कापड बांधणारे साई जवळजवळ सहा फुट उंच होते. भव्य कपाळ, वेध घेणारे डोळे, लांबसडक हात अशा दैवी दर्शनाने भाविकांचे डोळे व मन तृप्त करीत. जवळपास तीन ते चार तपे त्यांचे या द्वारकामाईत वास्तव्य घडले. या काळात त्यांनी पाण्याने दिवे लावले, अनेकांना व्याधी मुक्त केले. त्यांच्याकडे दूरदूरून भाविक येऊ लागले. साईबाबांनी आपल्या हयातीत कधी आपले नाव, जात, धर्म उघड केला नाही. ते हिंदूंना हिंदू तर मुस्लिमांना मुस्लीम वाटत. त्यांनी जगाला सबका मलिक एक व सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. साईचा प्रचार सर्वदूर झाला शिर्डीत भाविकांचा ओघ वाढला. साठे, दीक्षित, बुटी आदी भाविकांनी भक्तांच्या सुविधेसाठी व निवासासाठी वाडे (Sai Baba Samadhi) बांधले.
बाबांचे महानिर्वाण - विजयादशमी मंगळवार 15 ऑक्टोबर 1918 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबांनी द्वारकामाईत इहलोकीचा निरोप घेतला. निर्वाणापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई यांना नऊ रुपये दिले. मला वाड्यात घेऊन चला, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार गोपाळराव बुटीनी बांधलेल्या वाड्यात त्यांचा देह समाधिस्त करण्यात आला. या घटनेला यंदाच्या विजयादशमीच्या दिवशी 104 वर्षे पूर्ण (104 years of Sai Baba Samadhi) झाले.