अहमदनगर- केडगावात उपनगरातील कुटुंबातील तीन जणांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. कर्जाला कंटाळून पती, पत्नीसह मुलीने एकाच वेळी आत्महत्या केल्याने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. आत्महत्येची ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
संदीप दिनकर फाटक (वय 40), पत्नी किरण संदीप फाटक (वय 32), मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी आत्महत्या केलेल्या मृतांची नावे आहेत. कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल असून तिन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. पती, पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याने केडगावातील विठ्ठल कॉलनीतल्या रहिवाशांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
![एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-01-tree-familly-members-suicide-vis-7204297_06092021111745_0609f_1630907265_883.jpg)
कर्जाला कंटाळून आत्महत्या!!
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक माणगावकर यांनी प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये कर्जाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने हे आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून अ्द्याप याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या आत्महत्येमध्ये दहा वर्षाच्या मुलीने आत्महत्या का केली? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला असल्याने पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.