ETV Bharat / state

Dog Attack : मोकाट श्वानांनी तोडले तीन बालकांच्या गालाचे लचके

author img

By

Published : Mar 16, 2023, 8:40 PM IST

कोपरगाव शहरात श्वानांने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात लहान मुल गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे शहरात मोकाट श्वानांमुळे प्रचंड भीतीचे वातावरण आहे. हे श्वान लहान मुलांसह नागरिकांना लक्ष्य करीत आहे. शहरातील आयशा कॉलनी परिसरात आज सकाळी एका 3 वर्षीय बालकाच्या गालाला श्वानांने चावा घेत मास तोडले आहे.

Dog Attack
Dog Attack

शिर्डी : कोपरगाव शहरामध्ये मोकाट श्वानांनी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे श्वान लहान बालकांसह नागरिकांना लक्ष्य करतात. आज सकाळी शहरातील आयशा कॉलनी परिसरात घरा जवळ बसलेल्या एका 3 वर्षीय बालकाचा श्वानांने चावा घेत गालावर लचके तोडले. तर त्याच भागात ६ वर्षीय मुलाच्या मानेवर चावा घेतला असल्याने सदरील बालक गंभीररित्या जखमी झाले असुन हनुमान नगर भागातील एका चार वर्षीय मुलाच्या गालाचे लचके तोडले असल्याने तो देखील गंभीर जखमी आहे.

मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार : सदर जखमी लहान मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोकाट श्वानांचे धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वानांचा नगरपरिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आयशा कॉलनी भागातील जावेद अत्तार यांच्या ३ वर्षीय बालक, तसेच त्याच भागातील इम्रान तांबोळी याचा ६ वर्षीय बालक तसेच हनुमाननगर १०५ भागातील मोसिन शेख यांच्या चार वर्षीय मुलाच्या गालाचा लचका भटक्या श्वानांनी तोडला आहे. तिन्ही बालकांवर सध्या उपचार सुरू आहे.

पालीका अधिकाऱ्यांना धारेवर धरले : सदर घटनेची माहिती मिळताच भाजप नेते पराग संधान माजी उपनगराध्यक्ष आरीफ कुरेशी, माजी नगरसेवक हाजी महेमुद सय्यद,जितेंद्र रणशूर,हाजी अल्ताफ कुरेशी, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार , खालील कुरैशी, फकीर महम्मद पहिलवान आदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर संतत्प नागरिकांनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालय गाठून प्रशासक, पालीका अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा ,नागरिकांना सुविधा, पालिका प्रशासन नागरिकांना सुविधा देत नसेल तर वसुली पथकाची गाडी फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.

भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा : ज्यावेळेस मोकाट श्वान, डुकरे, इतर जनावरे पकडण्याची मोहीम सुरू असते त्यावेळेस काही प्राणी मित्र त्यास विरोध करतात. त्यामुळे मोकाट जनावर सोडून द्यावे लागत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनंतर पराग संधान म्हणाले की, नागरिकांच्या हिताचा विचार न करता जो कोणी प्राणी मित्र असे आडवे येत असेल तर पालिका प्रशासनाच्या बाजूने आम्ही सर्वच पक्षीय कोपरगावकर उभे राहू. काही भटक्या प्राण्यांमुळे नागरिकांना त्रास होत असेल, लहान बालक जखमी होऊन हजारो रुपये रुग्णालयात भरण्याची वेळ येत असेल तर नगर परिषदेने अशा भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कोपरगाव शहरातील सर्वच राजकीय पक्ष संघटना सामाजिक संघटनेने या कामात पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

हेही वाचा - Patanjali FPO : शेअर गोठविल्यानंतर पतंजली फूड्स आणखी आणणार एफपीओ, बाबा रामदेव यांचा मोठा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.