ETV Bharat / state

खंडणी मागणाऱ्या तीन जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात - जामखेड पोलीस

पिंपळगाव ऊंडा येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना जामखेड पोलिसांनी जेरबंद केले. नंदकुमार प्रकाश गोरे (वय ३०), सचिन बबन मिसाळ (वय ३४), आणि वाल्मिक किसन काळे (वय २४ ) सर्व राहणार आपटी ता.जामखेड) असे पकडण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.

Criminals
खंडणी मागणारी टोळी
author img

By

Published : Apr 22, 2020, 11:39 AM IST

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ऊंडा येथे गावठी कट्याचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणाऱया तिघांना जामखेड पोलिसांनी जेरबंद केले. नंदकुमार प्रकाश गोरे (वय ३०), सचिन बबन मिसाळ (वय ३४), आणि वाल्मिक किसन काळे (वय २४ ) सर्व राहणार आपटी ता.जामखेड) असे पकडण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.

जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपींचा शोध घेणारे पथक

सोमनाथ शिवदास जगताप यांना त्याच्या राहत्या घरी आरोपी गोरे, मिसाळ या दोघांनी दोन गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हॉटेल चालवण्यासंबधी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर जगताप यांना गाडीत बळजबरीने टाकून आरोपी गोरे याच्या शेडवर नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. जगताप यांना डांबून ठेवून त्यांचे वडिल आणि चुलते यांच्याकडून दोन लाखाची खंडणी वसूल केली.

पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली होती. या घटनेमुळे घाबरलेले जगताप हे पोलिसात तक्रार देण्यास तयार नव्हते. मात्र, लोकांनी धीर दिल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार खंडणीखोरांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

कर्जत एसडीपीओ कार्यालयातील कर्मचारी आणि आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी अशा दोन पथकांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. जवळके (ता.जामखेड) शिवारात पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीने खंडणीखोरांना पकडले. खंडणीखोराकडून दोन पिस्तूल, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी आणि ४० हजार रुपये जप्त करण्यात आले. यानंतर खंडणीखोरांना न्यायालयात नेले असता, त्यांना पोलीस कोठडी सुणावण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.