अहमदनगर : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्राविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची टीम अवैध अग्निशस्त्रे व हत्यारांबाबत माहिती घेत असताना अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानकात एक व्यक्ती गावठी कट्टे विक्रीस आणणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सापळा लावून सायकल स्टॅंड परिसरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एका व्यक्तीस पाठलाग करून पकडले. हा व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकल्या गेला. याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पोलिसांचा कारवाईत सहभाग : जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे व काडतुसे कोणास देण्यासाठी आणले होते. तसेच यामागे इतर कोणाचा हात आहे याचा तपास तोफखाना पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, चंद्रकांत कुसळकर आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी पणे पार पडली.
हेही वाचा : Crime In Thane : दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गजाआड; एकावर ८० गुन्हे, तर दुसऱ्यावर ११ गंभीर गुन्हे