ETV Bharat / state

सराफ दुकान फोडून दागिने लंपास, तर बाजारातून पळवले महिलेचे गंठन; अहमदनगरमधील प्रकार - thief

कोल्हार ग्रामपंचायतीजवळ सोमनाथ अडाणी यांचे संजीवनी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. त्या तिघांनीही तोंडाला स्कार्फ बांधला होता. चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी दुकानात आल्यावर दुकान मालकाच्या लक्षात हा प्रकार आला.

महिलेचे दागिने चोरुन पोबारा करताना चोर
author img

By

Published : Apr 1, 2019, 9:55 AM IST

अहमदनगर - सराफाचे बंद दुकान फोडून तीन अज्ञात चोरांनी दोन किलोंचे चांदीचे दागिने लंपाल केले आहेत. तर, आठवडी बाजारात दुचाकीवरुन आलेल्या चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळवले. हे दोन्ही प्रकार राहाता तालुक्यातील कोल्हार येथे घडले आहेत. या प्रकारामुळे लोकात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

सराफा दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले

कोल्हार ग्रामपंचायतीजवळ सोमनाथ अडाणी यांचे संजीवनी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. त्या तिघांनीही तोंडाला स्कार्फ बांधला होता. चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी दुकानात आल्यावर दुकान मालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी जावून पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत आठवडी बाजारातून जात असताना एका महिलेच्या गळ्यातील ५ तोळ्यांचे गंठन दुचाकीस्वारांनी पळवले. स्वाती पोटे या दर्शनासाठी चारचाकी गाडीतून आल्या होत्या. गाडीतून उतरताच दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील दागिन्यावर डल्ला मारला. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या चोरांनी गर्दीचा फायदा घेऊन तेथून पोबारा केला. ही घटनादेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राहाता तालुक्यातील कोल्हार येथे सराफाचे बंद दुकान फोडून तीन अज्ञात चोरट्यांनी दोन किलो चांदीचे दागिने तर भर आठवडे बाजारात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना घडली..दोन्ही घटनेत एकूण सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे....

VO_ कोल्हार ग्रामपंचायत जवळ असलेल्या सोमनाथ निवृत्ती अडाणी यांच्या संजीवनी ज्वेलर्स या दुकांचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी प्रथम दुकानातील दोन सीसीटीव्ही केमॅरे तोडले आपला चेहेरा स्पष्ट दिसू नये याकरिता या तिघांनी तोंडाला स्कार्फ बांधलेला होता..दुकानात असलेले चांदीचे सुमारे दोन किलो दागदागिने चोरट्यांनी लंपास केले.सकाळी दुकानाचे मालक सोमनाथ अडाणी आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली.दरम्यान लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले..चोरीची ही घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाले आहेत....

VO_ आठवडे बाजारात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे गंठण ओरबाडून धूम ठोकल्याची घटना घडली. सदर घटना आठवडे बाजाराच्या गर्दीत घडल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे....काल कोल्हार येथे शुक्रवारचा आठवडे बाजार होता यावेळी सिन्नर येथील स्वाती संदीप पोटे ही महिला भगवती मातेच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंब समवेत चार चाकी गाडीतून अली होती गाडीतून उतरताच अवघ्या 10 फुटांवर काळ्या विना नंबरच्या दुचाकी वरून आलेल्या दोघांनी एका झटक्यात सदर महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे सोन्याचे गंठन लांबविले यावेळी बाजारात असलेल्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या दोन चोरट्यांनी एवढ्या गर्दीत सुसाट वेगाने मोटारसायकल दामटत नगर मनमाड रस्त्याने धूम ठोकली..भगवती माता मंदिरालागत असलेल्या सीसीटीव्ही केमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे मात्र एकाच गावात दोन चोरीच्या घटना घडल्याने आता लोणी पोलिसांसमोर या चोरट्याना पकडण्याचे
आव्हान असणार आहे...याबाबत सोमनाथ अडाणी व स्वाती पोटे यांनी लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा तपास भय्यासाहेब देशमुख व सपोनि प्रवीण पाटील करीत आहेत. एकाच दिवशी चोरट्यांनी दोन्ही घटनेत एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविल्याने कोल्हार मध्ये खळबळ उडाली आहे....Body:30 March Shirdi TheftConclusion:30 March Shirdi Theft
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.