अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचारी वसाहतीतील साईस्मरण ईमारतीतील एका घरात सोमवारी चोरी झाली. ही धाडसी चोरी डॉ. रचना साबळे याच्या घरी झाली असून तब्बल आडिच लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांचा पहारा असतानाही चोरी झाल्याने वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईबाबा संस्थानच्या वसाहतीतील साई स्मरण A ईमारती मध्ये राहत असलेल्या साईनाथ रुग्णलयातील बाल रोग तज्ञ डॉ. रजना साबळे सायंकाळी 7 च्या सुमारास घरातील काही वस्तू घेण्यासाठी घराला लॉक करुन बाहेर गेल्या असताना काही चोरट्यानी घराचे लॉक तोडून घरातील कपाटातून सोन्याच्या दोन अंगट्या, 50 हजार रोख रुक्कम चोरुन नेली. साई संस्थानच्या कर्मचारी वसाहतीच्या सुरक्षतेसाठी संस्थानकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असतानाही चोरी झाल्याने वसाहतीत भीतीचे वातवरण निमार्ण झाले आहे. या घटनेची माहिती समजताच साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आणि शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
साईबाबा संस्थानमधील विविध विभागात काम करणारे कर्मचारी राहत असलेलेल्या साईनगर येथील वसाहतीच्या सुरक्षतेसाठी संस्थानकडून 24 तासा सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असतानाही या परिसरात वारंवार चोरीच्या घटना तसेच काही तळीराम रात्रीच्या वेळीस त्रास देत असल्याच्या तक्रारी देखील कर्मचाऱ्यांनी संस्थानच्या सुरक्षा कार्यालयकडे केली आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज हा प्रकार घडला असल्याचे डॉ. रचना साबळे यांनी सांगितले.